प्रशासनाला न जुमानता डिजेच्या तालावर दुर्गा विसर्जन. #Dj

Bhairav Diwase

देवाडा खुर्द येथे लागले गालबोट.

मिरवणुकी दरम्यान जमावाकडून पोलिसांना शिविगाड व अरेरावी झाल्याची सुत्रांकडून माहिती.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीत प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसतांना डिजेच्या कर्कश आवाजात गावातील काही इसमांनी हुळदूस घालून दुर्गा विसर्जनाला गालबोट लावल्याचा प्रकार घडला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवाडा खुर्द येथे दुर्गा विसर्जनासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही मिरवणुकीतील जमावाकडून शिविगाड व अरेरावी करण्यासारखा प्रकार घडल्याचीही माहिती समोर आली आहे.प्रशासनाकडून यावर कोणती कार्यवाही करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाकाळात प्रशासनाने धार्मिक कार्यक्रम, मिरवणुक,व जमावासंबंधीत बंदी घातलेली आहे.सोबत डिजे वाजविण्याचीही प्रशासनाने पुर्णपणे बंदी घातली आहे मात्र देवाडा खुर्द येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकी दरम्यान काही इसमांकडून प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली. शिवाय डिजे बंदीच्या आदेशालाही न जुमानता डिजेच्या कर्कश आवाजात मिरवणूक काढूण धुडगूस घालण्यात आले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून सदर प्रकाराबद्दल मज्जाव करण्यात आले मात्र मिरवणुकी दरम्यान कुणीही पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना जमावाकडून शिविगाड व अरेरावी झाल्याचीही सुत्रांकडून माहिती आहे.
   जमावबंदी व डिजेला परवानगी नसतांना देखील देवाडा खुर्द येथील दुर्गा विसर्जन मिरवणुकीत जो प्रकार घडला तो गंभीर प्रकार आहे. डिजेला परवानगी नसतांना  धुडगूस घालणाऱ्या काही इसमांवर पोलिस प्रशासन कार्यवाही करेल का असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.