🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

टाटांच्या नावाने "तो" व्हायरल होणारा संदेश बनावट. #Fake

एका जाहिरात्मक मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, टाटा समूहानं 150 वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्यांना टाटा नेक्सन ईव्ही वाहन मिळणार आहे. या मेसेजबद्दल टाटा समूहाने आता सतर्कतेचा इशारा दिलाय.

✍🏻संडे स्पेशल... Sunday special.
http://www.adharnewsnetwork.com/2021/10/blog-post.html

💥वैनगंगा नदी पार करून आलेल्या दोन मुलीने केला पोंभूर्ण्यात हाय व्होल्टेज ड्रामा.


नवी दिल्ली:- टाटा समूहाच्या नावाने गेल्या काही दिवसांपासून फसवणूक सुरू आहे, ज्याबद्दल लोकांना ग्रुपच्या वतीने ट्विट करून इशारा देण्यात आलाय. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, टाटा समूह किंवा त्याची कोणतीही कंपनी अशा प्रकारे कोणताही जाहिरात्मक मेसेज करत नाही. त्यामुळे तुमची दिशाभूल करून तुम्हाला कोणी जाळ्यात ओडत असल्यास ते टाळा आणि लोकांनाही असे मेसेज फॉरवर्ड करू नका.
150 वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून एक सर्वेक्षण....

एका जाहिरात्मक मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, टाटा समूहानं 150 वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्यांना टाटा नेक्सन ईव्ही वाहन मिळणार आहे. या मेसेजबद्दल टाटा समूहाने आता सतर्कतेचा इशारा दिलाय. आमच्याकडून अशा प्रकारचा कोणताही प्रचाराकरा उपक्रम आयोजित केला गेला नाही. त्यामुळे फेक मेसेजपासून सावध राहा.
लिंकवर क्लिक करण्यापूर्वी खातरजमा करा

टाटा समूहाने आपल्या इशाऱ्यांत म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा असे मेसेज येतात, तेव्हा सर्वप्रथम त्याचा स्रोत काय आहे ते शोधा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी मेसेज अनेक वेळा नीट वाचा. जर टाटा समूहाशी संबंधित कोणताही दावा केला जात असेल तर त्याची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि त्याच्या वेबसाईटवरदेखील उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत तिथे जा आणि त्याचे सत्य तपासा.
फेक मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका....

या व्यतिरिक्त, त्याचे url पाहा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी जर तुम्ही त्याची URL पाहिली, तर ती फेक आहे की खरी हे कळेल. जर तुम्हाला वाटत असेल की हा एक बनावट मेसेज आहे आणि त्यातून फसवणूक होऊ शकते, तर असा मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत