🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची शेगाव (बूज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट. #Warora

नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम एका महिन्यात पूर्ण करणार:- सौ. संध्या गुरनुले अध्यक्षा जिल्हा परिषद चंद्रपुर
वरोरा:- तालुक्यातील शेगाव (बुज) येथे आज जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संध्या गुरनुले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकाम बाबत तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ एक महिन्याच्या आत नवीन प्राथमिक केंद्राची इमारत जनतेला उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले. तसेच गावामध्ये डेंगू, मलेरिया, व साथीच्या रोगाची साथ सुरू असून लवकरच रोग निदान शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश दिले.
✍🏻संडे स्पेशल... Sunday special.

💥वैनगंगा नदी पार करून आलेल्या दोन मुलीने केला पोंभूर्ण्यात हाय व्होल्टेज ड्रामा.
जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवारात कचरा स्वछता दिसून आली नाही याबाबत तालुका आरोग्य अधिकारी रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून साफ सफाई करण्याचे निर्देश दिले. नविन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत बाबत संरक्षण भिंत बांधकामचे अंदाज पत्रक जिल्हा परिषद ला सादर करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पदभरती, साहित्य व साधन सामुग्री व यंत्र सामुग्री तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
     यावेळी सौ ज्योतीताई वाकडे सदस्या जिल्हा परिषद, डॉ मुंजनकर तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ चौधरी वैद्यकीय अधिकारी, सचिन भाऊ नरड जिल्हा महामंत्री भाजपा युवा मोर्चा. सिद्धार्थ पाटील सरपंच, सौ मांडवकर, श्री मानकर, श्री नीलकंठ वरभे, श्री ईश्वर नरड, श्री नितिन खंगार, श्री अजय लोढे, श्री राकेश काथवटे, श्री मनोज देवतळे, तसेच कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत