🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अतिवृष्टीमुळे शेतकरी झाला हतबल. #Farmers

सोयाबीनन, तुर, कापूस, भाजीपाला, धान पिकाला फटका.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील कोठारी तलाठी सांज्या अंतर्गत येणाऱ्या शेतीबहुल भिगात गुलाब चक्रीवादळा मुळे उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील सोयाबीन, कापूस, तुर, भाजीपाला व धान पिकाला फटका बसला असून यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजुनही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले नसल्याने शेतकरी हतबल ठरला आहे. तिन दिवस अतिवृष्टी व दोन दिवस उघाळ नंतर लगेच परतीच्या पावसाची रीपरीप चालूच असुन ओल्या दुष्काळाने हातची पिके पार होरपळून गेली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेच्या गडद काळोखात सापळला आहे.
कोठारी परिसरात या वर्षीच्या चालु हंगामात कापुस पेरा ६० टक्के, सोयाबीन पेरा २० टक्के, धान पेरा २० टक्के व तुर १० टक्के घेण्यात आलेला होता. यंदा पाऊस बऱ्याप्रमाणात झालेला असल्याने संपूर्ण पीके डौलाने उभी ठाकली. चांगले पीक येणार या आशेने शेतकरी जगू लागला. मात्र आशेची घोर निराशा झाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचे पडसाद बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरावर पळले आणि होत्याचे नव्हते झाले. चक्रीवादळापासून निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपीकाचे अतोनात नुकसान झाले. नदी,नाल्याच्या काठावरील पीके अक्शरशा वाहुन गेली तर वरटेकडी भागातील पीकांना अतिवृष्टीमुळे फटका बसला.
   सोयाबिन हे नगदी पीक म्हणून माणल्या जाते. पोळा हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सना पासून दिवाळी पर्यंत सोयाबिन कापणीला आलेली असताना मागिल तिन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे बहरलेल्या सोयाबीनला अंकुर फुटू लागले आहेत. तदनंतर दोन दिवस उघळीक दिल्या वर शेतकरी उसंत घेईना तोच परत पावसाची रिपरीप सुरू झाली. हातात आलेले सोयाबीन पीक उध्वस्त झाले. याचसोबत कापूस, धान, तुर, भाजीपाला यापीकाची हानी झाली आहे. या अस्मानी सुलतानी संकटामुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत जाहीर करावी अशी आर्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
    २६, २७, २८ सप्टेंबर या तारखेत झालेल्या अतिवृष्टीमुळे व वादळी संततधार पावसामुळे कापूस पिकाची पाने पिवळी पडली, बोंड सळ झाली, पाती गडून पडली व झाड वादळामुळे वाकून गेले. त्याचसोबत सोयाबिन पिक कापणीच्या काळात अतिवृष्टीमुळे शेंगा फुटल्या व शेंगांच्या दाण्याला कोंब फुटून पावसाच्या पाण्याने जमिनीवर पडून सळायला लागले आहेत.मिरची व धान पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांची दैना अवस्था पाहून तात्काळ मदत द्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत