Top News

शेतकऱ्यांना आता घरपोच मिळणार सुधारीत ७/१२. #Pombhurna

पोंभूर्ण्यातील सोनापूर गावातून झाला शुभारंभ
पोंभूर्णा:- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने २ आक्टोंबर गांधी जयंतीचे औचित्य साधून तहसिल कार्यालय पोंभूर्ण्याच्या वतीने गट ग्रामपंचायत आष्टा अंतर्गत येत असलेल्या सोनापूर गावात शेतकऱ्यांना घरपोच मोफत व सुधारित ७/१२ वाटप करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तहसिलदार शुभांगी कनवाडे, अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून नायाब तहसिलदार आनंद तिराणकर,आष्टा ग्रामपंचायतच्या सरपंचा किरण डाखरे, उपसरपंच रमेश कुंभारे यांची उपस्थिती होती.
महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या संबंधाने २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. नागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न असून खाते उतारा सोपा सुटसुटीत आणि बिनचूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तहसिल कार्यालय पोंभूर्ण्याच्या वतीने गट ग्रामपंचायत आष्टा अंतर्गत येत असलेल्या सोनापूर या गावातून सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी व घरोघरी जाऊन सात-बारे देण्यात आले.
यावेळी मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके,तलाठी जयवंत मोरे, ग्रामसेवक मनोज मुडावार, कोतवाल संतोष कुंचेवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर डाखरे, विनोद वडस्कर, विठ्ठल पिंपळशेंडे, रमेश ढुमणे, परशुराम वडस्कर, अमोल पिंपळशेंडे, सुभाष पोतराजे, संतोष बोढेकार, संदिप पोतराजे, सुरेश ढेंगणे आदी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने