चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधीन इमारतीला भीषण आग. #Fire

Bhairav Diwase

चंद्रपूर:- बल्लारपूर बायपास मार्गावरील पागल बाबानगर येथे मेडिकल कॉलेजचे काम चालू असलेलय इमारतीच्या कामगार वस्तीत सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागली.

हि घटना आज ५ रोजी सायंकाळी 7:30वाजताच्या दरम्यान घडली. रात्री ९.३० नंतरही आग आटोक्यात आली नव्हती. आतापर्यंत आठ सिलेंडरचा स्फोट झाले.
घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे, अग्निशमन विभागाचे श्री. चोरे यांच्यासह फायर कर्मचारी दाखल झाले. अद्याप कोणतीही जिवीतहानी समोर आली नसून, आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता.