नवेगाव मोरे येथे कांग्रेस बुथ कमेटी गठीत. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा :- तालुक्यातील नवेगाव मोरे येथे पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार यांच्या अध्यक्षतेखाली नवेगाव मोरे येथे बुथ कमेटीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
नवेगाव मोरे येथील बुथ कमेटीच्या अध्यक्ष पदावर गिरीधर मोरे तर उपाध्यायपदी सुनील भोयर यांची व एकवीस सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली.
कांग्रेसचे ध्येयधोरण,पक्ष वाढीसाठी कार्य, आगामी निवडणूका लक्षात घेता कार्यकर्त्यांच्या बैठका, नियोजन आदी कामे बुथ कमेटीच्या माध्यमातून करण्यात येणार.