जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स ॲड सायन्स गोंडपिपरी येथे वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न. #Gondpipari

गोंडपिपरी:- राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् ॲड सायन्स गोंडपिपरी येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ दिनांक 16 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला. #Adharnewsnetwork
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. महेंद्र डी. अक्कलवार यांनी कॉलेज चे वाचन प्रेमी रितिक तावाडे या विद्यार्थीच अभिनंदन केले व तसेच कठोर मेहनतीने आपण कुठलेही कार्य साध्य करू शकतो असे प्रतिपादन केले. समन्वयक प्रा. अविनाश चकिनारपूवार यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम याच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय सिंग वाचनाचे महत्व सांगितले, तसेच प्राचार्य डॉ. सि. ए. निखाडे यांनी कॉलेज चे वाचन प्रेमी रितिक तावडे यांना पारितोषिक देऊन त्यांना शुभेच्या दिल्या. डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबाच्या वैज्ञानिक दृष्टिकोन बद्दल सखोल अशी माहिती दिली. या कार्यक्रमाला महाविलायचे प्रा. संजय कुमार , प्रा. डॉ.आशिष चव्हाण, डॉ. जगदीश गभने, प्रा. प्रतीक बेझलवार, प्रा. शरद लखेकर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग होता.
रा. से. यो. चे सहसमन्वयक प्रा. उमेश वरघणे यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम चंदेल तर आभार प्रदर्शन प्रा. महेंद्र डी. अक्कलवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत