जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथे वन्यजीव सप्ताह साजरा. #Gondpipari

गोंडपिपरी:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, गोंडपिपरी येथे प्राणीशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि निसर्ग सखा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वन्य जीव सप्ताह साजरा करण्यात आला. या प्रस्तुत सप्ताह च्या अनुषंगाने महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती पर रॅली काढण्यात आली. या रॅलीस संवर्ग विकास अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली.

ही रॅली महाविद्यालया पासून ते स्थानिक पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आली. यात पोलीस अधीक्षक श्री. राजगुरू, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. निखाडे सर, पंचायत समिती अध्यक्ष, निसर्ग सखा संस्था चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, स्थानिक पत्रकार, सामान्य नागरिक तथा महाविद्यालयीन प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधीक्षक श्री. राजगुरू यांच्या अध्यक्षते खाली सभा आयोजित करण्यात आली आणि विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत