💻

💻

घराला आग लागून नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत. #Help


चंद्रपूर:- अचानक घराला आग लागल्याने आर्थिक नुकसान झालेल्या सिताराम वाघडकर कुटुंबीयांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. यावेळी भिवापूर वार्डातील यंग चांदा ब्रिगेडचे संघटक अमोल शेंडे यांच्यासह शुभम राखडे, सुशील वाकडे, अक्षय बनकर, शुभम वानखेडे, विजय मंदाने, गौरव राखडे, शंकर गजर, करण कात, कैलास गोंडे, विनोद सुडित, रघूनाथ गजर, सखाराम वाघडकर, प्रकाश भगाडे, मनोज सुडित, करण गजर, मनोहर गजर आदिंची उपस्थिती होती.
भिवापूर वार्डातील माता नगर चौक गवडी मोहल्ला येथील रहिवासी सिताराम वाघडकर हे कुटुंबासह बाहेर गेले असता सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे वार्डातील नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती सिताराम यांना मिळताच ते घरी पोहचले तोपर्यंत आगीने घराला चांगलेच कवेत घेतले. स्थानिक नागरिकांनी पाणी टाकून आग विजविण्याचा प्रयत्न केला. काही तासांच्या प्रयत्नांनतर स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले
मात्र तोपर्यंत घरातील नगद, सोन्याचे दागिने, विदयुत उपकरणे व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी दाखल होत पिडीत कुटुंबाची भेट घेत घराची पहाणी केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी संपूर्ण माहिती घेत सदर कुटुंबाला आर्थिक मदत केली असून शासनातर्फे मिळणारी मदतही पिडीत कुटुंबाला लवकर मिळावी या करिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सदर घटनेचा पंचनाम करण्याच्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत