जाहिरात... Advertisement... विज्ञापन

त्या मृतदेहाच्या हातावर "सपना I love you मे तुम से प्यार करता हुं"

बल्लारपूर:- दिनांक ०७/१०/२०२१ रोजी रात्री ०९:०० वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे रेल्वे स्टेशन उपप्रबंधक श्री. नंदनवार यांनी लिखीत रिपोर्ट दिली की, एक अनोळखी पुरूष इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष हा गोल पुलिया ते विसापुर जाणारे रेल्वे ट्रॅक चे पो.क्र ८८८ बी/२७ ऐ जवळ पडलेला आहे.

सदर माहिती वरून पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या आदेशाने पो. उप. नि तिवारी यांनी पोलीस स्टाफ सह घटनास्थळी जाऊन रेल्वे ट्रॅक जवळ पडलेल्या अनोळखी पुरूषास ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविले असता डाक्टरानीं तपासून त्याला मृत घोषित केले. यावरून पो.स्टे बल्लारपूर ला अक्समात मृत्यू क्र.८२/२०२१ कलम १७४ सी.आर.पी.सी नोंद असुन तपास सुरू आहे.

अनोळखी पुरुष याचे अंगावर काळी, लाल, ग्रे कलर ची फुल टी-शर्ट व निळ्या रंगाचा पेंट होता व त्याचे उजवे हातावर "सपना I love you, मे तुम से प्यार करता हुं" असे गोंदलेले आहेत.

सदर व्यक्तिस कुणी ओळखत असल्यास पो. स्टे.बल्लारपुर येथील पो.नि.श्री उमेश पाटील यांचे मो.क्र.९८२२५११७५१ पो.उप.नि तिवारी यांचे मो.क्र.७९७२७७३६०१ यावर कळवावे. किंवा पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत