Top News

भोयेगाव जवळील वर्धा नदीच्या पुलावरील खड्डे बुजवा. #Korpana


खड्डे न बुजवल्यास भाजपाने दिला आंदोलनाचा इशारा.

कोरपना:- कोरपना तालुक्यातील भोयगाव जवळील वर्धा नदीवरील पुलावरील खड्डे बुजवण्यात यावे ,अशी मागणी भाजप ने केली आहेत,

आदिलाबाद, बेला, कोरपना, जिवती, गडचांदूर, राजुरा येथून नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर ला जोडणारा मुख्य रस्ता असून या मार्गे सिमेंट कंपनीच्या चार सिमेंट फॅक्टरी आहे व या मार्गे अनेक वाहने 24 तास दिवस-रात्र सुरू राहतात या मार्गाने बस, ट्रक, कार, दुचाकी, बैलबंडी, शेतकरी, शेतमजूर व इतर वाहने रोज दिवस रात्र जात येत असतात, या पुलावर ठिक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.
तर भविष्यात होणारी जिवित हानी रोखण्यासाठी पी डब्लु डी तसेच लोकप्रतिनिधींनी व महाराष्ट्र शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन हे खड्डे बुजवून होणारी जीवित हानी टाळावी यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास कोणतीही अडचण राहणार नाही करिता पुलावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, सतीश उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर, नथु पाटील ढवस भाजपा महामंत्री, मनोहर कुरसंगे महामंत्री, विशाल गज्जलवार, संजय मुसळे, पुरुषोत्तम निब्रड, कवडु पाटील जरिले, अरुण मडावी सरपंच, पुरुषोत्तमजी भोंगळे उपाध्यक्ष, किशोर बावणे, अमोल असेकर, अनिल कवरासे, शशिकांत अडकिने, विजय रणदिवे माजी सरपंच, संजय चौधरी, दिनेश खडसे, दिपक भोस्कर, भास्कर वडस्कर, गजानन लांडे आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला आहे. आठ दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने