पोंभुर्णा तालुका कार्यकर्ता आढावा बैठक.
पोंभूर्णा:- शिवसेना पोंभुर्णा तालुका व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सभागृहात शिवसेना दिनांक २ ऑक्टोबर ला कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आले.
✍🏻संडे स्पेशल... Sunday special.
💥वैनगंगा नदी पार करून आलेल्या दोन मुलीने केला पोंभूर्ण्यात हाय व्होल्टेज ड्रामा.
या आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्या शितल सेठ देऊडकर,शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे,युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे, व आदी प्रमुख पदाधिकरी उपस्थीत होते.
आगामी होणार्या नगर पंचायत,जिल्हा परिषद या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून शिवसेनेचे संघटन बळकट करा प्रभाग,वार्ड,गावनिह्याय शाखा निर्माण करा. असे आपल्या मनोगतातून रुपेश कदम यांनी सुचना केले तर जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शिवसैनिकासोबत चर्चा करीत पक्ष कार्यकर्ते व पदाधिकार्यांना होणार्या स्थानिक संस्थेच्या निवडणूका संदर्भात चर्चा करुण पुढिल निवडणूक ताकदीने लढवू असे मार्गदर्शन केले. निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. पक्षसंघटन बळकट करण्यासोबतच मतदार स्थितीबाबत मुद्देनिहाय चर्चा करण्यात आली.
यावेळी अनेक गावतील देवाडा खुर्द, चेक ठाणेवासना, नवेगाव मोरे, पिपरी देशपाडे, घाटकुळ येथील युवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,महिला आघाडी तालुका प्रमुख किरण डाखरे,तालुका समन्वयक विजय वासेकर,कांता मेश्राम, सुनिता गोरंतवार,थेरगाव येथील उपसरपंच वेधनाथ तोरे,युवासेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार,शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार,लोकाजी दामपेलीवार,किशोर डाखरे,रवी ठेंगने अक्षय व्याहाडकर,सचिन आत्राम,संदीप सुमटकार,साहिल पोरते,गणेश दिवसे व आदी कार्यकर्ते पदाधिकरी उपस्थीत होते.