🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

तेंदुपत्ता तोडून पै-पै जमवून घेतले पुस्तक; MPSC त पटकाविला पाचवा क्रमांक. #MPSC

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
सिरोंचा:- परिस्थीती कशीही असली तरी परिश्रम, सातत्यपुर्ण प्रयत्न केले कि यश मिळतेच. गडचिरोली जिल्हयातील सिरोंचापासून सत्तर किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम भागातील पिरमीडा गावातील विलासने हे सिध्द केलय.आई वडील अशिक्षीत अशावेळी मनरेगा, कॅटरिंगचे काम व तेंदुपत्ता तोडून त्याने पै पै जमविला त्यातून पुस्तक घेतली. प्रचंड अभ्यास केला. अनं यश मिळविले.

✍🏻संडे स्पेशल... Sunday special.
http://www.adharnewsnetwork.com/2021/10/blog-post.html

💥वैनगंगा नदी पार करून आलेल्या दोन मुलीने केला पोंभूर्ण्यात हाय व्होल्टेज ड्रामा.

नुकताच लोकसेवा आयोगाच्या एसीएफ परिक्षेचा निकाल जाहिर झाला. त्यात विलासने बाजी मारली.अनु जाती गटातून राज्यात प्रथम येण्याचा मान त्याने पटकविला.
विलास किष्टया चेन्नुरी हे या तरूणाचे नाव. गडचिरोली जिल्हयातील सिमावर्ती भागातील सिंरोचापासून सत्तर अंतर किलोमीटर अंतरावरील पिरमीडा हे त्याचे गाव. आई वडील अशिक्षीत, त्यांना शेतीही नाही. अशावेळी विलासने चौथीपर्यत गावातच प्राथमिक शिक्षण घेतले. यानंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याने प्रचंड परिश्रम घेतले. कित्येक किलोमीटरचा पायदळ प्रवास त्याच्या ध्येयापूढे नमला. घरीच स्थिती अतिशय बेताचीच अशावेळी गावात मनरेगाच्या खड्डे खोदण्याचे काम त्याने केले. कॅटरिंगमध्ये बरेच वर्ष त्याने काम केल. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परिक्षाच आपल भविष्य घडवू शकते हा आशावाद त्याच्यात निर्माण झाला. 2015 पासून काम करता करता त्याने स्पर्धा परिक्षा दिल्या.पण त्याला यश मिळाले नाही. अपयशी होउन देखिल तो खचला नाही.
सन 2018 मध्ये त्याने एमपीमएसची वनसेवाची परिक्षा दिली. पुर्वपरिक्षा, मुख्यपरिक्षा उत्तीर्ण केली, मुलाखतही दिली. पण केवळ चार गुणांनी तो मागे पडला. सातत्याने आलेल्या अपयशाने तो पुरता खचला. अशावेळी काही मित्रांनी त्याला आधार दिला. त्याला प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने विलास पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासा लागला. 2019 च्या लोकसेवा आयोगाची वनसेवेची परिक्षा पुन्हा त्यानं जोमान दिली. पुर्व,मुख्य दोन्ही परिक्षा उत्तीर्ण केल्या. यावेळी काहीही करून यश मिळवायचच असा चंग त्याने बांधला.अन शेवटी मुलाखतीच पत्र आल. घरी पैसे नाही. गडचिरोली जिल्हयात तेदुपत्ता हंगाम अनेकांसाठी मोठा आर्थीक आधार ठरतो. अशावेळी विलासने तेंदुपत्ता तोडीचे काम केले. त्यातून मिळालेल्या पैशाने तो मुलाखतीसाठी गेला.
...अन् मिळाली गुड न्यूज...

नुकताच लोकसेवा आयोगाच्या वनसेवा परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यात विलास चेन्नूरी अनु.जाती गटातून राज्यात पहिला आला, तर संपुर्ण राज्यातून तो पाचवा आला. सातत्याने मिळालेल्या अपयशानंतर मिळालेल्या यशाने त्याच्या संपुर्ण गावासह त्याच्या परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही.
हार मानू नका.....

"स्पर्धा परिक्षा देतांना साधारणत अनेकदा अपयश येत. यामुळ विद्यार्थी नाराज होतात. काही जण ते क्षेत्रच सोडतात.पण सातत्यपुर्ण प्रयत्नांनी यश मिळतेच. आपले ध्येय प्रबळ असले तर गरीबीही आड येउ शकत नाही."
विलास चेन्नूरी, पिरमीडा
खडतर प्रवास.....

सिरोंचा हा गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका. पिरमीडा हे गाव तिथून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. आधीच नक्षलग्रस्त परिसर अन त्यात दळणवळणाची साधन नाहीत अशात विलासने अतिशय खळतर प्रवास करित अधिकारी होण्याच स्वप्न साकार करित आदिवासी दुर्गम भागातील अनेकांपुढे नवा आदर्श निर्माण केला. विलासने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, भाउ मधुकर, बहिण मीना, काका लक्ष्मण चेन्नुरी, महेश चेन्नुरी यांना दिले आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत