जाहिरात... Advertisement... विज्ञापन

कबड्डीचा सराव करताना केला १४ वर्षीय मुलीचा कोयत्याने वार करून खून. #Murder


पुणे:- शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला.
मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. बिबेवाडीचा यश लॉन्स परिसरात ही घटना घडली.
क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कबड्डीपटू होती. आज सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. ज्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केलाय. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला.
एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत