अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणारा युवक पोलिसांच्या ताब्यात. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- पोभूर्णा पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला चंद्रपूर येथील युवकांने लग्नाचे आमिष दाखवून व फुस लावून पळवून नेल्याची घटना 15 ऑक्टोंबर रोजी घडली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अल्पवयीन मुलीला व पळवून नेणार्‍या युवकाला नागपूर येथून ताब्यात घेतले. दोघांनाही पोंभूर्णा पोलीस ठाण्यात आणून अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.तर आरोपी युवकाला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
सविस्तर वृत असे की १५ ऑक्टोबर रोजी पोंभूर्णा येथून एका अल्पवयीन मुलीला आरोपी नामे वैभव कुचनकर रा. इंदिरा नगर चंद्रपूर यांने लग्नाचे आमिष दाखवून व फुस लावून नागपूर येथे पळवून नेले. या बाबतची तक्रार दि.१६ ऑक्टोबर रोजी दिल्याने पोलिस स्टेशन पोंभूर्णा येथे अपराध क्रमांक १०८/२०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये आरोपी विरूद्ध मुलीला फुस लावून पळवून नेल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यत आला. यातील पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने व सदरचे प्रकरण हे संवेदनशिल स्वरूपाचे असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन पोंभूर्णा व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी संयुक्त कारवाई करण्याकरिता एक पथक तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेतृत्वाखालील नागपूरला रवाना करण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर येथून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी पोंभुर्णा पोलीस स्टेशन येथे आणून सदर अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. व आरोपी वैभव कुचनकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दादाजी ओल्लालवार करीत आहे.