प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना "कार्यशाळा पंचायत समिति पोंभुर्णा येथे संपन्न. #Pombhurna

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- दि. २० ऑक्टोबरला पंचायत समिती सभागृह पोंभूर्णा येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना "एक जिल्हा, एक उत्पादन" या धर्तीवर राबविली जात असुन या योजनेअंतर्गत मुख्यत्वे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाना सक्षमिकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे.
तसेच शेतकरी, उत्पादक संस्था, बचत गट, सहकारी संस्था, यांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, मुल्यवर्धन, बैकवर्ड-फॉरवर्ड लिंकेज, ब्रॅैंडिंग, व बाजारपेठ सुविधेकरिता योजनेअंतर्गत पैकेज उपलब्ध होणार आहे. तरी सदर योजनेचा बहुसंख्य लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन सदर कार्य शाळेत करण्यात आले.
 
   सदर कार्यशाळा तालुका कृषी कार्यालय पोंभुर्णा मार्फत आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेला उद्घाटक म्हणून पंचायत समिती येथील सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी या योजनेची व्याप्ती, उद्देश या बाबत सविस्तर माहिती दिली. सदर कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात शेतकरी, उमेद क्याडर व कर्मचारी उपस्थित होते.