Top News

जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी पोंभुर्णा येथे उमेद अभियान अंतर्गत दिवाळी फराळ विक्री केंद्राला भेट देऊन फराळे व वस्तूची केली खरेदी. #Pombhurna


पोंभुर्णा येथे उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटाची दिवाळी फराळ विक्री.
पोंभुर्णा:- जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी पोंभुर्णा येथे आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला भेट देऊन फराळे व वस्तू खरेदी केले. तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती पोंभुर्णा स्वयंसहायता समूहाद्वारे दिवाळी फराळे विक्री केंद्राचे स्टाल लावण्यात आले आहे. यामध्ये विवीध प्रकारचे वस्तू, खान्याचे पदार्थ स्टाल वर लावण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी स्टॉल ला भेट देऊन फराळे व वस्तूची खरेदी करावे.
ग्रामीण भागातील महिलांनी छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा वाटा मोठा आहे. पोंभुर्णा तालुक्यात या अभियानामुळे सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यात "उमेद" जागविण्यात यश मिळत आहे. उमेदमुळे स्त्रियांना स्वरोजगार निर्मिती होऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळून त्यांचा आर्थिक स्थर उंचावेल असे जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित लक्ष्मण गव्हारे, चंद्रशेखर झगडकर, उमेद च्या महिला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने