🌄 💻

💻

विविध उपक्रमाने झाशी शारदा मंडळाचा शारदोत्सव संपन्न. #Program(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील मौजा धोपटाळा येथील गुरूदेव नगर वार्ड येथे झाशी शारदा महिला मंडळाच्या वतीने शारदोत्सव आणि नवरात्रोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात लहान मुले, शालेय विद्यार्थी आणि महिला वर्गांचा उत्साह वाढविणाऱ्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले. यात फॅन्सी ड्रेस, फॅशन शो, पारंपारिक खेळ - स्पर्धा आदींचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त विजेत्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले.


  या सर्व कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन करण्यासाठी झाशी शारदा महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमा शेंडे, उपाध्यक्ष सुनिता निवलकर, सचिव शिल्पा इटणकर, कोषाध्यक्ष निशा केवट, सदस्य छाया वैद्य, विठाबाई बोढे, सुनिता भोयर, वर्षा बाभळे, मंदिरा बार, मंगला इटणकर, लिला चन्ने, ताईबाई तपासे, रेखा लिंगे, शारदा ऐडलावार, रंजु वैरागडे, वैशाली टेकाम, रितू वैद्य, सविता भलमे, दिव्या इटणकर, शितल चन्ने, कामतवार काकू, दर्शना कमटम, आरती तपासे, पोटेबाई, इटणकर काकू यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल धोपटाळा ग्रामपंचायतचे व सर्व नागरिकांचे मंडळाचे वतीने आभार मानण्यात आले.#Program

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत