💻

💻

सभापती सुनील उरकुडे यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता राजुरा आगारला दिली भेट. #Rajura


येत्या दोन दिवसांत सोमवारपासुन बसेस पुर्ववत चालु होणार:- आशिष मेश्राम आगार प्रमुख राजुरा.
राजुरा:- कोरोणा काळात शहरातील शाळा महाविद्यालये बंद होते त्याकरिता विद्यार्थ्यांकरिता चालु असलेल्या महामंडळ बसेस बंद करण्यात आल्या होत्या. काही दिवसापुर्विच शाळा, महाविद्यालये सरकारने पुर्ववत चालु करण्याचा निर्णय घेतला. शाळा चालु होऊनही राजुरा महामंडळच्या बसेस विद्यार्थ्यांकरिता रस्याने फिरकल्याच नाही.
करिता सास्ती-गोवरी जि.प. क्षेत्रातील माथरा, गोयेगाव, गोवरी, पोवणी, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, मारडा, धिडशी, चार्ली, बाबापूर, मनोली गावातील विद्यार्थांनी जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल ऊरकुडे यांच्याकडे धाव घेतली.
शिक्षणासाठी राजुऱ्याला ये-जा करतांना अडचण होत असल्याचे विद्यार्थ्यानी सभापती यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंर सभापती सुनिल ऊरकुडे यांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट राजुरा आगार गाठले आणि विद्यार्थ्यांची समस्या निवेदनामार्फत आगारप्रमुख आशिष मेश्राम यांच्याकडे सापविल्या.
त्यानंतर आगारप्रमुखांसी सभापती यांनी चर्चा केली असता कोरोना काळात शाळा महाविद्यालये बंद असल्या कारणाने बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता सर्व अडचणींचे निराकरण करत दोन दिवसात बस सेवा पुर्ववत चालू करणार असा शब्द आगारप्रमुखांनी सभापती सुनील उरकुडे यांना दिला.
    त्यावेळी भूषण जूनघरे,अजय बांदुरकर,हर्षल वणकर उपस्थित होते. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पुर्ववत बस चालु होणार असल्याचे ऐकुण सभापतींचे आभार मानले व आनंद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत