पोंभूर्णा व नवेगाव मोरे येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन. #Pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्ण:- तालुका व शहर काँग्रेस कमेटी ‌पोंभूर्णा च्या वतीने २६ ऑक्टोंबर ला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार बाळू धानोरकर, अध्यक्षस्थानी काॅंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष कवडू कुंदावार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमात कृषी विषयक धोरण, विकास कामे,पक्ष व कार्यकर्ता संगठन,पक्षाची भूमिका,आदीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय तालुक्यातील चेकठाणेवासना, नवेगाव मोरे, डोंगरहळदी या गावांना भेटी देऊन समस्या जाणून घेण्यात येणार आहे. २६ ऑक्टोंबर रोज मंगळवार ला चकठाणेवासना येथे मारोती लटारु धोटे यांचे कडे सांत्वन भेट, नवेगावमोरे येथे रेखाताई दत्तुभाऊ मोरे गृहभेट, गिरीधर रमेश मोरे यांच्या आवारात दुपारी ३.३० वाजता कार्यकर्त्यांशी चर्चा व मार्गदर्शन कार्यक्रम,दुपारी ४.३० वाजता पोंभूर्णा कृषि उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा च्या आवारात भव्य कार्यकर्ता मेळावा. सायंकाळी ६.३० वाजता डोंगरहळदी येथे रुषी पोल्लेलवार यांच्या कडे गृहभेट घेणार आहेत. कार्यकर्ता मेळाव्यात बहुसंख्यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमेटी पोंभूर्णा अध्यक्ष कवडू कुंदावार यांनी केले आहे.