💻

💻

व्याहाड बुज ला दारू दुकान नको दुकानाची परवानगी दिल्यास महिला तर्फे आंदोलनाचा इशारा. #Saoli #saolinews


महिलांनी घेतली पत्रकार परिषद.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय गेले अनेक वर्षापासून होता. मात्र विद्यमान पालकमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी या निर्णयात बदल करून दारू बंदी हटवली कारण ती दारू बंदी फसवी होती खेडो पाड्यात गल्लो गल्लीत देशी विदेशी मोह फुला चि डुप्लिकेट दारू विकली जात होती आणि डुप्लिकेट दारू च्या शेवन केल्या ने अनेक झन दगावले होते. व युवक दारू व्यवसाय करण्यासाठी या धंद्यात उतरून अनेक झणानी आपल परिवारा पासून दूर झाले ही फसवि दारू बंदी हटवून चंद्रपूर जिल्ह्यात दारू चालू केली. आता दारू सुरु झालेली आहे अनेक गावात देशी दारूच्या दुकाना करिता ग्रामपंचायत कडून एनओसी घेण्यासाठी देशी विदेसी दारू दुकानदाराचि चढाओढ लागलेली आहे.
याचाच प्रकार म्हणून सावली तालुक्यातील व्याहाड बुज ग्रामपंचायत ला काही लोकांचे दारू दुकानाची परवानगी मिळण्याकरिता ग्रामपंचायत लाअर्ज प्राप्त झालेल आहेत आणि ग्रामपंचायत ने 25ऑकटोबर ला मासिक सभा घेण्यात येत असून पुढील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये कोणाला दारू दुकानाची परमिशन मिळेल व कोणाचे अर्ज फेटाळले जाईल यावर खमंग चर्चा असताना व्याहाड बुज येथील महिलांनी एकोरी मातेच्या पवित्र स्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ यांचे प्रेस कान्फरन्स लावून महिलांनी दारू दुकानाच्या परवानगीला ग्रामपंचायत ने मान्यता दिल्यास व्याहाड वासीय महिला ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
व्याहाड बुज हे गाव एकोरी मातेचे पवित्र स्थान म्हणून ओळखले जातो येथे अनेक बाहेरगावचे भाविक भक्त येत असतात हे लक्षात घेता काहि वर्षा आधी व्याहाड बुज येथे दारूचे दुकान सुरू होती ते दुकान महिलांनी बंद केले होते त्यामुळे पुन्हा व्याहाड बुज येते देशी-विदेशी दारूची दुकाने उघडण्यात येऊ नये दारूची दुकानाला ग्रामपंचायतीने परवानगी दिल्यास व्याहाड बुज येथील महिला ग्रामपंचायत वर आंदोलन करून वरील दुकान चालू होऊ देणार नाही असे पत्रकार परिषदेत महिलांनी आपले म्हणणे व्यक्त केले या पत्रकार परिषद ला शेकडो महिला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत