जाहिरात... Advertisement... विज्ञापन

विरुर स्टे. येथे शारदा देवी मंडळ तर्फे गरजु महिलांना साडीचे वाटप. #Socialwork(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, विरुर स्टे.
विरुर स्टे.:- विरुर स्टे. येथे असलेले अहिल्यादेवी शारदा महिला मंडळाच्या वतीने नवरात्रीचे औचित्य साधून देणगीतून जमा केलेल्या पैशामधून गावातील गोरगरीब व गरजवंत
निराधार महिलांना साडीचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी विरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या शुभ हस्ते स्त्री शक्तीचा सन्मान मानून महिलांना साडीचे वाटप करण्यात आले.


मंडळाचे अध्यक्षा अरुणा ठमके यानी आपले मत व्यक्त करतांना म्हणाले की, देणगीचे पैसे इतर कोणत्याही विषयावर खर्च न करता गरजु महिलांना साडी वाटप करून शारदा देवी मंडळाचे उपक्रम यशस्वी झाला.
या कार्यक्रमाला उपस्थित विरुर स्टे. बीट हवालदार माणिक वागदरकर, तसेच विशेष अतिथी म्हणून सरपंच भाग्यश्री आत्राम, भाजपा अध्यक्ष सतीश कोमरपेलिवर, पोलीस विभागातील महिला कर्मचारी सविता गोनेलवार, प्रियंका राठोड, रोशनी घिवे, तसेच कर्मचारी हेडकॉन्स्टेबल दिवाकर पवार, विजय मुंडे, प्रलाद जाधव, सुरेंद्र काळे, प्रमोद मिलमिले, अतुल शहारे, भगवान मुंडे विजू तलांडे तसेच समस्त गावकरी उपस्थित होते.#Socialwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत