तरूणाची गळफास घेत आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथिल तरूण वैभव शर्मा याने घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज पहाटेला उघडळीस आली.
घटनेची माहीती धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूशिल धोकटे यांना देण्यात आली. पोलीस विभागाने घटना स्थळ गाठून पंचनामा केला. पुढील चौकशी धाबा पोलीस करीत आहेत. वैभवचा पश्चात वडील, आई, बहीण असा परिवार आहे. त्याचा अवेळी जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.