Top News

"मैंने ब्रेकअप कर लिया".... म्हणत टॅटू मिटवण्यासाठी तरुण-तरुणीची डॉक्टरकडे धाव. #Tattoo


नागपूर:- दिवसागणिक प्रेमाची परिभाषा बदलत आहे, तसे प्रियकर, प्रेयसीमध्येही बदल जाणवत आहेत. आज सोबत असलेली ती किंवा तो उद्या असेलच असे नाही. यामुळे हौसेने तिचे किंवा त्याचे नाव गोंदवून घेतले असले तरी संबंध तुटताच ते काढून टाकण्यासाठी जीवाची आटापिटा करताना दिसून येत आहे. टॅटूने वैतागल्यांसाठी मेडिकलच्या स्किन विभागाची मदत मिळत आहे. टॅटू मिटविण्यासाठी रोज तीन ते चार तरुण-तरुणी येत आहेत. #Adharnewsnetwork
दिवसेंदिवस टॅटूची क्रेझ वाढत आहे. याला सर्वांत उचलून धरले ते प्रेमवीरांनी. भावनेच्या भरात बोटावर, मनगटावर, दंडावर, छातीवर, मानेवर तिच्या किंवा त्याच्या नावाचा परमनन्ट टॅटू काढला जात आहे. धरमपेठ येथील टॅटू आर्टिस्ट यांनी सांगितले, दिवसभरात पूर्वी चार ते पाच जण टॅटू काढण्यासाठी यायचे; परंतु आता गर्दी वाढल्याने अपॉइंटमेंट घेऊन त्यांना बोलवावे लागत आहे. आम्ही टॅटू काढताना यातील धोके सांगतो; परंतु अनेक जण ऐकण्यापलीकडे असतात. जेव्हा प्रेमभंग होऊन टॅटूने वैतागतात, तेव्हा ते मिटविण्यासाठीही येतात. अलीकडे यांचीही संख्या वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले. मेडिकलमध्ये टॅटू मिटविण्यासाठी ह्यक्यू स्विच्ड लेजर ट्रीटमेंटह्ण नावाचे यंत्र आहे. सध्या याचा वापर वाढल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दर तीनपैकी एक जण कंटाळलेला.....

प्रेयसी किंवा प्रियकराच्या नावाच्या टॅटूला कंटाळलेल्यांची संख्या वाढत असताना आता जुन्या झालेल्या टॅटूचाही वैताग आल्याची संख्या वाढत आहे. पाश्चात्त्य देशामध्ये नुकत्याच झालेल्या त्वचारोगतज्ज्ञांच्या परिषदेत टॅटू करांचा वैताग उघडकीस आला. टॅटू काढून घेतलेल्या दर तीनपैकी एक जण त्याला कंटाळला असल्याचे या परिषदेत उघड झाले. एका खासगी रुग्णालयातील त्वचातज्ज्ञांनी केलेल्या सहाशे लोकांच्या पाहणीत पुरुषांपेक्षा महिला टॅटूला जास्त वैतागल्याचे आढळून आले. यात ब्रेकअप झालेल्या तिच्या किंवा त्याच्या नावाचा टॅटू मिटवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती.
टॅटू मिटविण्यासाठी चार ते पाच वेळा घ्यावे लागतात उपचार.....

मेडिकलच्या त्वचारोग विभागाचे डॉ. जयेश मुखी म्हणाले, कायमस्वरूपी टॅटू मिटविण्यासाठी अलीकडे तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे. टॅटू मिटविण्यासाठी चार ते पाच वेळा उपचार घ्यावे लागतात. विशेष म्हणजे, लाल रंगाचे टॅटू मिटविणे कठीण जाते. यात जास्त वेळ जातो. टॅटू मिटविल्यावर पडलेला डाग मिटविण्यासाठी वेगळा उपचार घ्यावा लागतो.
स्कीन स्टोनची मदत.....

टॅटू आर्टिस्ट यांनी सांगितले, स्कीन स्टोनच्या मदतीने छोट्या आकाराचा टॅटू लपवता येतो. या प्रक्रियेत कायमस्वरूपी काढलेल्या टॅटूवर त्याचा त्वचेसारखा रंग तयार केला जातो. नीडल मशीनने हा रंग त्वचेच्या तिसऱ्या स्तरापर्यंत अंदाजे २ मिलिमीटर पेनीट्रेट केले जाते; परंतु याचा फायदा ८० टक्केच होतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने