Top News

पांडुरंग जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाटण येथे सत्कार सोहळा संपन्न. #program



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- गोडंवाना गणतंत्र पार्टीचे जेष्ठ नेते आदर्श ग्रामविकास बहुदेशीय संस्था नंदप्पा चे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक श्री मा. पांडुरंग जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्ताने पाटण येथिल राजिव गांधी कला महाविद्यालय येथे विरुर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ए.पी.आय मा. राहुल चव्हाण सर यांचे शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आले. तर पाटण येथील आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा वर्कर याना साडी-चोळी सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आले. तर जिवती तालुक्यातील ३६५ दिवस शाळा सुरु ठेऊन शिक्षन देणाऱ्या राज्य पुरस्कार प्राप्त प्रा.राजेद्र प्रत्येकी सर यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी उपस्थित गोडंवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गजानंद जुमनाके बाबुमिया शेख राजेद्र प्रत्येकी रामा पवार मुसा शेख बाबा कोडापे अली रजा अदानी आदिंची उपस्थिती होती.#program

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने