चिंतलधाबा गावातून ६ बकऱ्या चोरीला. #Theft

Bhairav Diwase
बकऱ्या चोरी करणारी टोळी सक्रीय.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथे ११आक्टोंबरच्या मध्यरात्री नंतर अडिच वाजताच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी गावातील सहा बकऱ्या चार चाकी वाहनातून चोरी करून पळाले असून. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यात बकऱ्या चोरणारी टोळी सक्रीय झाली असल्याचे अनुमान वर्तविण्यात येत आहे.
चिंतलधाबा येथील बस स्टॅण्ड चौकात अनिल बाबाजी मोहूर्ले यांच्या गोठ्यात शेळ्या बकऱ्या बांधून होत्या. काही अज्ञात इसम चार चाकी वाहनातून येऊन चोरीच्या उद्देशाने त्यांच्या गोठ्यातील तीन बकऱ्या गाडीत टाकले. तसेच गावातील गितेश कालिदास मिलमिले यांच्या गोठ्यातून तीन बकऱ्या चोरी करून गाडीत टाकून पसार होत असताना शेजारी असलेले गणेश मिलमीले यांना जाग आली त्यांनी आरडाओरडा केला असता चोरट्यांनी त्या बकऱ्यांना घेऊन चारचाकी वाहनातून पोंभूर्णा च्या दिशेने पसार झाले.
अनिल बाबाजी मोहूर्ले यांचे बकरे ३ नग व गितेश कालिदास मिलमीले यांचे ३ नग असे एकूण ६ नग बकरे चोरी करण्यात आले. बकरी मालकाचे अंदाजे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेचा पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेश बोरकुटे करित आहेत.