(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शेतात मळणी करून ठेवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील चार्ली शेतशिवारात घडली असुन चोरट्यांच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चार्ली येथील शेतकरी मनोज मुसळे यांनी काल दिनांक ११ ऑक्टोबरला आपल्या शेतातील सोयाबीन ची मळणी करून रात्र उशीर झाल्यामुळे शेतातच ठेवले. सकाळी शेतात गेल्यानंतर पाहिले असता सोयाबीनच्या ढिगातून अंदाजे तीन पोती सोयाबीन चोरून नेल्याचे उघडकीस आले. शेतातील काढलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परीसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून यावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.