जाहिरात... Advertisement... विज्ञापन

कोविड लसीचे २७०० डोस गोठले. #Vaccine


धक्कादायक प्रकार....
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चिमूर:- लशींचा सर्वत्र तुटवडा असताना भिसी येथील प्राथमिक आरोग्य केद्रात कोविड लसीचे तब्बल दोन हजार सातशे डोस गोठल्याची धक्कादायक घटना समोर आली. येथील वैद्यकीय अधिकारी प्रियंका कष्टी आणि आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे दोन हजार सहाशे आणि कोवॅक्सीनचे शंभर डोस चुकीने डीप फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे ते खराब झाले. शीतसाखळी केंद्राची आणि लशीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांच्याकडे होती. मात्र, कराळे यांना जबाबदारीत कुचराई केली.
सोबतच वैद्यकीय अधिकारी यांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे लशी गोठल्याची घटना घडली. या दोघांचे बेजबाबदार वर्तन आणि लसीची किंमत त्यांच्याकडून वसूल करण्याबाबचा कारणेदाखवा नोटीस त्यांना बजाविला आहे. या दोघांनीहा आपले म्हणणे मांडण्यासाठी चोवीस तासांचा अवधी दिला आहे. लसींसाठी लोकांच्या रांगा लागत आहे. अशा परिस्थितीत हजार लसी निकामी होणे गंभीर आहे. त्यामुळे या दोन्ही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जावे, अशी मागणी चिमूर पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक यांनी केली. १३ ऑक्टोंबरला लसीकरणाच्या आधी कराळे यांनी चुकीने डोस डीप फ्रीज मध्ये ठेवले. मी स्वतः कराळे यांचे यांना कारणे दाखवा नोटीस दिला आहे. कराळे यांनी चूक मान्य केली आहे, असे वैद्यकीय अधिकारी प्रियंका कष्टी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत