जाहिरात... Advertisement... विज्ञापन

संकेत कुळमेथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी. #Appointment


कोरपना :- तालुक्यातील गोंडवाना गणतंत्र पार्टीची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात कोरपना तालुक्यातील वडगाव येथील गोंडीयन चळवळीत विद्यार्थी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे संकेत कुळमेथे यांची गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कोरपना तालुका सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
आजोबा मलकाजी पाटील कुळमेथे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा समोर घेऊन जात असताना वयाच्या अवघ्या 16 वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवला, समाजाच्या प्रश्नांची जाण असलेला, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिल्या जात.
संकेत कुळमेथे गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
संकेत कुळमेथे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. या वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर, माजी सभापती भीमराव मेश्राम, जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, राजुरा तालुकाध्यक्ष अरुण उदे, जेष्ठ नेते भीमराव जुमनाके, महिला मोर्चा तालूकाध्यक्ष विमल कुळमेथे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत