Top News

वन्यजीवांचे संरक्षण ही काळाची गरज.-विदेशकुमार गलगट #Wildlife

वन्यजीव सप्ताहानिमित्त वनभ्रमंतीचे आयोजन.

वाघ व अस्वली च्या पाऊलखुणानी वेधले विद्यार्थ्याचे लक्ष.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा वनपरिक्षेत्रातील कार्यक्षेत्रात असलेल्या विद्यालयीन विद्यार्थ्यांना वन्यप्राणी व वनातील प्रजातींची ओळख व वनउद्यान राजुरा व रोपवाटिका सुमठाणा मधील वृक्षाची ओडख करून देण्याकरिता तसेच जोगापुर वनपर्यटन क्षेत्रात वनभ्रमंती चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज करत वन्य प्राणी, औषधी वनस्पती यांचे महत्त्व विशद केले व वन्यप्राण्यांचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता प्रत्येक मानवाने वन्य प्राण्यांचे महत्व समजून घेऊन त्यांच्या सुरक्षितते करिता उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे विचार व्यक्त केले. 


  मध्य चांदा वनविभागाचे उप वनसंरक्षक अरविंद मुंढे व उपविभागीय वन अधिकारी ए. बी. गर्कल यांच्या मार्गदर्शनात वन्यजीव सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्थानिक आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी या वनभ्रमांती मध्ये सहभाग घेतला. 


याकरिता राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांचे मार्गदर्शन लाभले. जोगापुर येथील वनपर्यटन अंतर्गत विविध पर्यटनस्थळ, जंगल सफारी, तलावाकाठील पक्षी निरीक्षण करण्यात आले. यादरम्यान वाघ व अस्वली च्या पाऊल खुणानी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. वाघ व वाघिन यांच्या पायाच्या पंज्याच्या आधारे त्या पाऊलखुणा वाघाच्या आहेत की वाघिणीच्या याची ओळख विशेषता यादरम्यान करून देण्यात आली. जंगल सफारी दरम्यान विद्यार्थ्यांनी थोड्या अंतरावर पायदळ चालत येथील औषधी वनस्पतींची व विविध प्रजातींच्या वृक्षांची माहिती सुद्धा समजून घेतली.


वन्यजीव सप्ताह यशस्वितेकरिता प्रकाश मत्ते, क्षेत्र सहाय्यक राजुरा, नरेंद्र देशकर क्षेत्र सहाय्यक विहीरगाव, संगमवार, क्षेत्र साहेब टेंबुरवाई, वनरक्षक एम. एम. वानखेडे, देवानंद शेंडे , जावळे, जाधव, मेश्राम, चंदेल, संदीप आदे, विजय पचारे, अमर पचारे तसेच वनमजूर व चौकीदार यांचे सहकार्य लाभले. वाघाच्या पाऊलखुणा यावेळी तिच्या साहाय्याने मोजून दाखवत या पाऊलखुणा नेमक्या ओळखायच्या कशा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या जंगल सफारीचा मनसोक्त आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.#Wildlife

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने