Top News

चोरीच्या घटनांनी पिपरबोडीवासीय त्रस्त. #Bhadrawati

मागणी पूर्ण न केल्याने कर्नाटका एम्टा विरोधात आत्मदहनाचा पत्रपरिषदेत इशारा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथून जवळच असलेल्या पिपरबोडी गावातील नागरिकांना सध्या दोन समस्यांनी त्रस्त केले असून त्यांनी आता थेट आत्मदहनाचा इशारा पत्रपरिषदेतून दिला आहे.
पत्रपरिषदेत बोलताना पिपरबोडी या गावचे माजी ग्रा.पं.सदस्य शंकरय्या गुरय्या काॅलनिडी यांनी सांगितले की,मागील सहा दिवसांपासून पिपरबोडी गावात चोरींच्या घटनांचे सत्र सुरु आहे. हे चोर दुसरे-तिसरे कोणी नसून गावातीलच काही लोक आहेत.दारुबंदी उठल्यामुळे गावातीलच अवैध दारु विक्री करणारे लोक आता चो-या करायला लागले आहेत. दि.५ आॅक्टोबर रोजी पहाटे भागोदेवी गोवर्धन यादव यांची अंगणात खुट्याला बांधलेली गाभण गाय चोरीला गेली. तर विरेंद्र राजभर यांची म्हैस चोरीला गेली. 
त्यापूर्वी माजी उपसरपंच मलय्या गसगंटी यांच्या अंगणातील लोखंडी गेटची चोरी झाली. श्रीनिवास बोक्का यांच्या घरातील विहिरीत असलेले मोटरपंप चोरी गेले. आडम मडगुल्ला यांच्या घरातील दोन एच.पी. गॅस सिलिंडर, गॅस शेगडी व घरगुती वापरातील सामान चोरी गेले.चेक बरांज येथील राऊत यांची बैलजोडी चोरीला गेली. पिपरबोडी आणि चेकबरांज येथील नागरिक शेती व दुग्धव्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची जनावरे चोरी गेल्यामुळे त्यांच्यासमोर उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरी करणा-या विरुद्ध एखाद्या नागरिकाने पोलिसांत तक्रार केल्यास चोरी करणारा त्या तक्रारीसोबत कोणत्याही कारणावरुन तक्रारदारासोबत झगडा करुन जीवे मारण्याची धमकी देतो व मारहाण करतो. त्यामुळे गावातील सर्वसामान्य जनता पोलिसांत तक्रार द्यायला पुढे येत नाही. अशा प्रकारे पिपरबोडी गावातील जनजीवन भयभित झाले असल्याचे काॅलनिडी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
तसेच अनेक गावक-यांच्या स्वाक्ष-यांचे एक निवेदन ठाणेदार गोपाल भारती यांना दि.५ आॅक्टोबर रोजी सादर करुन चोरींच्या घटनांची चौकशी करुन गुन्हेगारांना सजा देण्यात यावी व चोरी गेलेले साहित्य संबंधितांना परत मिळवून द्यावे,अशी मागणी करण्यात आल्याचे काॅलनिडी यांनी पत्रपरिषदेत सांगितले. सध्या नवीन पिपरबोडी येथे हातभट्टीची दारु, गांजा, जुगार, सट्टा इत्यादी अवैध धंदे सुरु असून हे धंदे व वाढत्या चोरींचे प्रमाण रोखण्याकरीता गावातील नवयुवकांना पोलिस मित्र म्हणून मान्यता देऊन त्यांना ओळखपत्र दिल्यास आम्ही सुद्धा रात्रीची गस्त घालून पोलिसांना मदत करु, असेही पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
दरम्यान, बरांज(मो.) येथील खुल्या कोळसा खदानीकरीता चेक बरांज अंतर्गत सर्व्हे क्र. ८५/२, ८६/२-ब, ८८/२ व सर्व्हे क्र. १३ यांची भूमीसंपादीत प्रक्रिया करताना घोळ करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणीही पत्रपरिषदेत चेक बरांजच्या सरपंच प्रभा गडपी आणि माजी ग्रा.पं.सदस्य शंकरय्या काॅलनिडी यांनी केली. यासंदर्भात ठाणेदारांना निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले. के.पी.सी.एल.कंपनीकडे प्रत्यक्ष ताबा पावती असेल तर प्रत्यक्ष ती कोणी दिली. असा प्रश्न उपस्थित करत याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही पत्रपरिषदेत करण्यात आली. भूसंपादन कायदा १८९४ नुसार भूमी संपादित हितसंबंध जमीन मालकाशी व घरमालकाशी आपसी समझोत्याने कोणतेही व्यवहार न करता, नोटीस न देता विश्वासघात करण्यात आलेला आहे.असाही आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला असून न्याय न मिळाल्यास सर्व गावकरी आत्मदहन करु असा इशाराही काॅलनिडी यांनी पत्रपरिषदेत दिला. यासंदर्भात कर्नाटका एम्टाच्या अधिका-यांशी प्रतिक्रीया  जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रतिक्रीया उपलब्ध होऊ शकली नाही.
      पत्रपरिषदेला चेकबरांजच्या सरपंच प्रभा गडपी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे, भिमराव कुमरे, गिरीजा पानघाटे, संतोष कडेलवार, भागोदेवी यादव, मोना जाॅन, पारस यादव, विरेंद्र राजभर, बाला मेडपल्ली, सोनू राजभर, अमरसिंग ठाकूर, शत्रुघ्न गौंड, सूरज राजभर, गणेश अय्यर, त्र्यंबक पानघाटे, संगीतराव सुका उपस्थित होते.
  

त्या भागात गस्त वाढविली आहे. पिपरबोडी येथील नागरिकांची चोरीच्या घटनांची तक्रार प्राप्त झाली असून त्या भागात दिवसा आणि रात्री पोलिसांची गस्त वाढविली आहे.पोलिसांच्या दोन गाड्या फिरत आहेत.चोरीसंदर्भात नागरिकांना सावध करण्यात आले आहे.#Bhadrawati

                 गोपाल भारती
              ठाणेदार,पो.स्टे.भद्रावती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने