जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ग्रामीण भागातील विद्यार्थी बनणार कंपनी सेक्रेटरी. #Pombhurna #CA #CS


पोंभूर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा यांचा भारतीय कंपनी सचिव संस्थान यांच्याशी आपसी करार झाला आहे या कराराअंतर्गत कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी चा अभ्यासक्रम स्थानिक विद्यार्थी चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स मधून सहजरीत्या करू शकणार आहे. #Pombhurna #CA #CS
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीए, सीएस प्रमाणे मोठ्या स्वरूपाचे असलेले कोर्स ग्रामीण भागात उपलब्ध होत नव्हते त्या पार्श्‍वभूमीवर चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांनी भारतीय कंपनी सचिव संस्थान यांच्याशी करार केला असून पोंभुर्णा येथे अभ्यास केंद्र सुरू केले आहे.
कंपनी सेक्रेटरी या अभ्यासक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थी आता पोंभुर्णा सारख्या गावात घेऊ शकणार आहे कंपनी सेक्रेटरी हा लिमिटेड कंपनीचा व्यवस्थापकीय अधिकारी असून कंपनी कायद्यानुसार त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सार्वजनिक तथा खाजगी कंपन्यांमध्ये कंपनी सेक्रेटरी हे कार्य पाहत असतात.
कंपनीच्या संचालकांनी ठरविले धोरणे अमलात आणण्यासाठी कंपनी सेक्रेटरी कार्य करीत असतात. करिता हा अभ्यासक्रम सनदी लेखापाल अर्थात सीए या अभ्यासक्रमाच्या बरोबरीचा आहे. महाविद्यालयाचे सचिव श्री स्वप्नील दोंतूलवार यांच्या प्रयत्नातून सदर अभ्यासक्रम सुरू झाला असून त्याचे कार्यकारी संचालक म्हणून प्राध्यापक ओमप्रकाश सोनोने हे कार्य पाहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संघपाल नारनवरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत