Top News

बल्लारपूरातील 15 गुन्हेगारांना पोलिसांनी केले तडीपार. #Police



(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे सुरुवातच बल्लारपूर शहरातुन सुरू झाली. अवैध कोळशा, दारू यासह मादक पदार्थांची तस्करी अशा विविध माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहे या अनुषंगाने बल्लारपूरातील १५ गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या आदेशानव्ये तडीपार करण्यात आले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक २९ वर्ष रा.सुभाष वार्ड बल्लारपूर, मंगेश दशरथ बावणे ३२ वर्ष, रा. श्रीराम वार्ड बल्लारपूर, राजू उर्फ गोलू राजू बोहरिया २० सुभाष वार्ड बल्लारपूर, प्रकाश उर्फ बंटी प्रेमलाल ठाकूर २७ टिळक वार्ड बल्लारपूर, किसन देवराज सूर्यवंशी २३ टिळक वार्ड बल्लारपूर, अनवर शेख अब्बास शेख ३० आंबेडकर वार्ड बल्लारपूर, पुनमदास प्रेमदास मुन ३६ डॉ.राजेंद्रप्रसाद प्रसाद वार्ड बल्लारपूर या उल्लेखित व्यक्तींना चंद्रपूर जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपारीचे आदेश देण्यात आले आहे तर रोशन रामप्रसाद पाल ३० वर्ष रा.संतोषी माता वार्ड बल्लारपूर यांना चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व यवतमाळ या ४ जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.
दीपक उर्फ रिंकू कोमल चव्हाण २३ वर्ष महाराणा प्रताप वार्ड बल्लारपूर यांना चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपीपरी, पोंभुर्णा, राजुरा या ५ तालुक्यातून १ वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. अमरदीप अशोक तेलंग ३१ मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, दर्शन अशोक तेलंग ३१ मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, मल्लेश ओदेलु देरपल्ली २३ वर्ष, यांना चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपीपरी, राजुरा व पोंभुर्णा या ५ तालुक्यातून ६ महिन्याकरिता तडीपार करण्यात आले आहे. शाहरुख शेरखान पठाण २२ मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर, अनिकेत मोहन गायकवाड २१ रविंद्र वॉर्ड बल्लारपूर, साहिल मोहन सिंगलवार १९ रविंद्र नगर वार्ड, बल्लारपूर यांना ६ महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यापैकी ९ व्यक्तींना पोलीस अधीक्षक चंद्रपूर तर ६ व्यक्तींना उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या आदेशानुसार तडीपार करण्यात आले असून यापैकी सदरील कुणीही व्यक्ती उपरोक्त कालावधीत संबंधित क्षेत्रात आढळून आल्यास त्यांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशन क्रमांक ०७१७२-२४०३२७ किंवा उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर मो.नं ९८२२५११७५१ यावर संपर्क साधन्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.#police

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने