जमावबंदीचा वढा यात्रेला फटका.
चंद्रपूर:- घुग्घूस जवळील वढाच्या यात्रेला कार्तिक पौर्णिमा च्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी चंद्रपूर सह शेजारील जिल्ह्यातून लाखो भाविक-भक्त प्रति वर्षी येत असतात. मात्र यावर्षी वढा यात्रेला जमावबंदीचा फटका बसला आहे.
यावर्षी 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी कलम 144 जमावबंदी आदेशानुसार वढा येथील यात्रा महोत्सव रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. कुणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.