जाहिरात... Advertisement... विज्ञापन


✌️

✌️


🎂

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बल्लारपुर भाजपातर्फे आंदोलन. #Ballarpur

बल्लारपूर:- दिनांक 02/11/2021 रोजी महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जगाचे पोट भरणारा पोशिंदा शेतकरी आज संकटात सापडलेला आहे मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले यावेळी महाभकास आघाडी सरकारने फक्त मदत देण्याचे खोटे आश्वासन दिले परंतु दिवाळीची सुरुवात होऊन सुद्धा त्यांना मदत न मिळाल्यामुळे आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी बांधवांच्या जीवनात पसरलेला अंधार दूर व्हावा आणि या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी यावी या करिता एक दिवा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ लावून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या समोर भाजपाच्या समस्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले याप्रसंगी प्रामुख्याने हरिषजी शर्मा नगराध्यक्ष बल्लारपूर , अजयजी दुबे कामगार आघाडी प्रदेश महामंत्री, आशिष देवतळे जिल्हाध्यक्ष भाजयुमो चंद्रपूर, काशिनाथ सिंह शहर अध्यक्ष भाजपा बल्लारपूर, किशोर पंदीलवार तालुका अध्यक्ष भाजपा बल्लारपूर , हरीश गेडाम जिल्हा परिषद सदस्य, सोमेश्वर पद्मगिरवार पंचायत समिती सदस्य, रमेश पिपरे तालुका महामंत्री, मनीष रमिला शहर सचिव, रुपेश पोडे, मोरेश्वर उदिसे योगेश पोतराजे मुन्ना श्रीवास, सुधाकर पारधी, श्रीकांत उपाध्याय तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत