चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाच्या मागणीला यश. #Ballarpur


बल्लारपूर:- कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या सुपरफास्ट ट्रेन पॅसेंजर ट्रेन बंद पडली होती. परीस्थिती जैसे ठीक होत गेली टप्प्याटप्प्याने ट्रेन चालू करण्यात आले. यातच एक महत्त्वाची ट्रेन म्हणजे बल्लारशा गोंदिया पॅसेंजर जी कोरोना काळानंतर चालू झाली व ती फक्त गोंदियावरून चांदा फोर्ट स्टेशनपर्यंत येत होती.
ही ट्रेन बल्लारशा स्टेशन पर्यंत यावी याकरिता चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशा यांच्यावतीने महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई व डी.आर.एम नागपूर यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला व आज या मागणीला यश आले.

आज ही पॅसेंजर दु १:१५ बल्लारशा स्टेशन येथे येणार असून दु.१:४५ वा गोंदिया करिता सुटणार आहे.याकरिता चंद्रपूर रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशा यांनी रेल्वे प्रशासनाचे व नागरिकांनी केलेल्या सहकार्यचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत