शेतकरी संकटात: अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीत शेतांचे तत्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा:- आशिष कावटवार. #Pombhurna

Bhairav Diwase
कृषी मंत्री दादा भुसे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.
पोंभुर्णा : अवकाळी पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या धान-कापूससह अन्य पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. तालुक्यातील शेतकरी हवालिदल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या कडे व तहसिलदार शुभंगी कानवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पोंभुर्णा तालुक्यात काल अवकाळी पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे धान,कापूस,सोयाबीन,व आदींसह नुकतेच लागवड करण्यात आलेल्या फळे, पालेभाज्या, टोमॅटो आदिंचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे पोंभुर्णा तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या धान (भात) पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांमध्ये पाणी असल्यामुळे ती सडून लागली आहेत.यामुळे या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देवुन त्यांच्यावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यात यावा.तसेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पिकविमे काढले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमे काढले नसतील अशा नुकसानग्रस्त शेतकºयांºया पिक नुकसानीचे पंचनामे करु न विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळविण्याकरिता कृषी व महसूल विभागाने संबंधितांना अहवाल सादर करावा, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी तहसिलद व कृषी मंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी मुळे हिरावला गेला आहे.या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याची मागणी कावटवार यांनी केली आह.