सोंडो येथील ग्रामपंचायतीचा कारभार भगवान भरोसे. #Grampanchayat

विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तथा गावकऱ्यांच्या वतीने सोंडो ग्रामसेवीकांना दिले निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मागील अनेक महिन्यांपासून सोंडो येथे नळ वारंवार बंद असतात त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते आहे, तसेच गावातील स्ट्रीट लाईट अनेक ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून ते चालू बंद करायला सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात कुणीही कर्मचारी सुद्धा असल्याचे दिसून येत नाही.


व मागील दोन वर्षापासून गावात नाल्यांची साफसफाई होत नसल्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून गावकऱ्यांना आरोग्याचा सुद्धा धोका निर्माण झाला आहे.
अश्या अनेक समस्या घेऊन राजुरा राष्ट्रवादी तालुका युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या नेतृत्वात ग्रामसेविका कालीमाले मॅडम यांना निवेदन देण्यात आले. व ह्या सर्व समस्या त्वरित सोडविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.
अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी तालुका युवक कॉंग्रेस तथा गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 
 यावेळी राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, सोंडो ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे युवा नेते दादाजी उमरे, सोंडो राष्ट्रवादीचे युवा नेते उमेश दुर्गे, राजू तंगलवार, सामाजिक कार्यकर्ते पिंकू रत्नपारखी, अशोक गेडाम राजू कष्टी, किसन झाडे, भाऊजी करमनकर तथा राष्ट्रवादी तालुका युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते तथा गावकरी उपस्थित होते.#Grampanchayat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत