महेश मेंढे यांना कांग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण. #Beating

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दि. १३ नोव्हेंबरला ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र न टाकल्याच्या रागातून काँग्रेसचे विधानसभेचे माजी उमेदवार महेश मेंढे यांना सीटीपीएसच्या विश्रामगृहाजवळ आणी कार्यक्रम स्थळी मारहाण केल्याने काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात एक गट सक्रिय असून, यापूर्वीही एका गटाने शहरात लावलेल्या फलकावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. महेश मेंढे हे नेहमीच वडेट्टीवारविरोधी भूमिका घेत असल्याने वडेट्टीवार समर्थकांमध्ये रोष आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत शनिवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांचे स्वागतफलक लावण्यात आले. मात्र, मेंढे यांनी लावलेल्या स्वागत फलकावर पालकमंत्रीचा फोटा टाकण्यात आला नाही. त्यामुळे कांग्रेस कार्यकर्त्यांनी मेंढे यांना जाब विचारला. यावेळी बाचाबाची होऊ प्रकरण हातघाईवर आले. यावेळी मेंढे यांना कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.