महिला बचत गटांनी महिलांना सक्षम केले:- हंसराज अहीर. #Bhadrawati

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या असून बचतगटाव्दारे गृहउद्योगाची उभारणी करून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी वरोरा येथील स्त्री शक्ती सन्मान सत्कार सोहळयात केले.
उज्ज्वला गॅस व आवास योजनांचा गरीब महिलांना फायदा झाला असल्याचे यावेळी अहीर यांनी सांगितले. स्त्री शक्ती सत्कार सोहळा १८ नोव्हेंबर रोजी डॉ. अंकुश आगलावे यांचे घराजवळील भव्य पटांगणावर   नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भास्करराव पेरे पाटील आदर्श गांव औरंगाबाद यांनी डॉ. अंकुश आगलावे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तुमचे भले झाले आता लोकांचे भले करा असा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविला.  या देशात दोन माणसं प्रमाणिक आहेत. एक देशाचा सैनिक आणि दुसरा खेडयातील बाई. तसेच आपले काम आपण प्रमाणिकपणे करावे तेव्हाच देश समक्ष बनेल असेही पेरे यांनी यावेळी सांगितले. 
        या कार्यक्रमात गुरूदेव आध्यात्म गुरूकूल, गुरुकुंज आश्रम मोझरीचे अध्यक्ष रवीदादा मानव यांनी प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे त्याकरीता घरा-घरात जिजामाता होणे गरजेचे आहे असे सांगितले. स्त्रीयांचा आदर व संरक्षण करण्याचे धडे जिजामातेने दिले तेच आजच्या स्त्रीयांना करायचे आहे. मातृशक्तीचा वापर करून पुढची पिढी सक्षम करून देशाचे उज्वल भविष्य घडवावे असे भाषणातून त्यांनी सांगितले. 
                मंचावर उपस्थितांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीयांना शिक्षणाची दारे उघडे करून सन्मानाने जगायचे शिकविले असे सांगितले. तसेच माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्त्री ही विश्वाची निर्मिती असून समाजात मातेला वेगळेच स्थान असल्याचे सांगत गुरूदेवाचे विचार प्रत्येक मातेपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. माजी सभापती व जि.प. सदस्या अर्चनाताई जीवतोडे यांनी गावाचा विकास माहिलाच करते व ग्रामसभेचा विषय महिलांना माहित असने आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. 
          डॉ. अंकुश आगलावे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातून आदर्श गांवाची संकल्पना मांडली व गांव कसे आदर्श करता येईल तसेच युवापिढी सुदृढ, महिला सक्षमीकरण कसे करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अंकुश आगलावे व हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून स्त्री सत्कार सन्मान कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी उपस्थितांसमोर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. 
या सत्कार भद्रावती व वरोरा तालुक्यातील महिला व पुरूष सरपंच, महिला व पुरूष बचतगट, निवृत्त वेकालि कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस पाटील, कृषी सखी व पशु सखी, गुरूदेव सेवा भजन पुरूष व महिला मंडळ, समाजसेवक व समाजसेविका यांचा ग्रामगीता व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच कॅन्सर पिडीत रूग्णांना, कोरोना काळात मृत पावलेल्या कर्ता  पुरूषांच्या कुटुंबियांना व वैद्यकिय शिक्षण घेणा-या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच मान्यवरांच्या हस्ते सन २०२२ च्या दिनदर्शिकेचे  प्रकाशन करण्यात आले.  
                या सत्कार सोहळा कार्यक्रमाला जि.प.सदस्या अर्चना जिवतोडे, नरेंद्र जीवतोडे, बाबा भागडे, रमेश राजुरकर, प्रविण ठेंगणे, लक्ष्मणराव गमे, सेवकराम मिलमिले, प्रा. रूपलाल कावळे, बोढाले गुरूजी, सुरेखाताई पाटील, प्रफुल ताजने, आशाताई ताजने, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अंकुश आगलावे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रशांत खुळे  व  आभार प्रदर्शन सुदामजी ठक यांनी केले.
               कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश दांडगे, हॅंडसन राव, संदीप भोयर, दिनेश ठाकरे, सचिन फुंडकर, मंगेश मारतडे, विजय ताजने, नगाळी साळवे, शंकर सोनटक्के, आनंदराव ढवस, गजानन ढवस, सुभाष पिंपळकर,  राजु देठे, लहू आगलावे,  संतोष काळे, संदीप झाडे, नीलेश ढवस, बंडू वनकर, बबलू रॉय, बिंदी सिंग, सुनिता यादव आदींनी परिश्रम घेतले.