Top News

छठपूजा सत्य,अहिंसा व करूणेचा उत्सव- डॉ. अंकुश आगलावे #bhadrawati



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:-‌ छठपूजा हा सत्य अहिंसा, क्षमा व करूणेचा उत्सव आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानवाधिकार संघठन नवी दिल्ली चे विदर्भ अध्यक्ष तथा श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक डॉ. अंकुश आगलावे यांनी माजरी कॉलरी येथील शिरणा नदीवर छठपूजा कार्यक्रमाप्रसंगी केले.
माजरी कॉलरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही छठपूजेच्या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मावळत्या सूर्याची भक्तीभावाने पूजा अर्चना केली जाते. यावेळी हजारो महीला छठपूजा निमित्त आपल्या मुलांकरीता तीन दिवसाचा निर्जळी उपवास करतात. या उत्सवात मोठया टोपली, ऊस व सर्व प्रकारची फळे ठेवून मोठया गाजावाजात हा सण साजरा करतात.
कार्तिक महिन्यात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या काही भागात हा सण साजरा केला जातो. हा हिंदु धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा नदीवर केली जाते. छठ सणात सूर्याची उपासना केल्याने छठ मातेला आनंद मिळतो आणि कुटुंबात सुख शांती आणि समृध्दी येते. अशी धारणा आहे. सूर्य नारायणाला प्रसन्न करण्याकरीता प्रभु श्रीरामचंद्र आणि पांडवांनी छठ पुजा करून सुर्यनारायणाला प्रसन्न केल्याचे डॉ. अंकुश आगलावे यांनी यावेळी सांगितले. माजरी कॉलरी येथील शिरणा नदीवरील घाटावर हंसन राव, अजय तिवारी, रवी श्रीवास्तव, सुनिल शास्त्री महाराज, नारायण वरारकर, एकनाथ चिकटे, सिंधू सिन्हा व अनेक उत्तर भारतीय पुरूष महिला उपस्थित होते.#bhadrawati

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने