पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कमी न करणे हा म्हणजे राज्यसरकारचा हुकूमशाही प्रमाणेने घेतलेला निर्णय आहे:- जिल्हाध्यक्ष भाजयुमो विशाल निंबाळकर #BJP

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने राज्यसरकार विरोधात बाबुपेठ मंडळात आंदोलन.

व्हॅट कमी न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा भाजपचा इशारा:- डॉ मंगेश गुलवाडे


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे.
मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यसरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने पूर्व,पश्चिम, उत्तर,दक्षिण व मध्य मंडळात आंदोलनाचे आयोजन विविध चौकात करण्यात आले होते त्या प्रसंगी जनता कॉलेज चौकात पश्चिम मंडळाच्या वतीने आयोजित आंदोलनात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कमी न करणे म्हणजे राज्य सरकारचा आपल्या कर्तव्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न असून या आघाडी सरकारला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही व भाजपची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला पाचही मंडळात आंदोलनाची यशस्वी सांगता करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.युवा नेते चंद्रपूर जिल्हा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष विशालजी निंबाळकर, युवा नेते महानगर महामंत्री तथा मंडळ पालक सन्मा‌.ब्रिजभुषणजी पाझारे, मंडळ अध्यक्ष संदिप आगलावे, नगरसेवक प्रदिप किरमे, नगरसेविका सौ कल्पना ताई बगुलकर, महानगर युवा मोर्चा उपाध्यक्ष कुणाल गुंडावार,राहुल पाल मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष हिमांशू गादेवार.मंडळ बुथ प्रभारी दशरथ सोनकुसरे, मंडळ बुथ प्रमुख दिवाकर पुददटवार ,भाजयुमो मंडळ महामंत्री अमित सकणार,सौ.सुषमाताई नागोसे, मुकेशजी गाडगे,पराग मलोडे, सुभाष ढवस,अमोल नगराळे, नंदकिशोर बगुलकर,मयुर बहेल,वैभव डाहुले,कलाम शेख,रोहनक पठाण,सनी बहेल,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.#BJP

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत