बैलबंडीला मोटरसाईकलची जबर धडक; तरूणाचा मृत्यू .#Death

राजुरा तालुक्यातील धिडशी येथील घटना

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील मारडा (लहान) येथील महेश अनिल पिंपळकर (वय २१ वर्ष) हा दुर्गापूर येथून कामावरून येत असताना सायंकाळी ६:३० वाजता गावाजवळील धिडशी गावालगत शेतातून येत असलेल्या बैलबंडीला जोरदार धडक दिल्याने महेश जागीच ठार झाला.
महेश पिंपळकर यांची शेती वेकोलीने अधिग्रहीत केल्याने नुकतेच वेकोलीमार्फत दुर्गापूर येथे त्यांचे नोकरी पूर्व एक महिन्याचे प्रशिक्षण (व्हिटीसी) सुरु होते, दुर्गावर येथून प्रशिक्षण करून घरी येत असताना धिडशी गावाबाहेर संतोष सपाट यांच्या गोठ्याजवळ शेतातून कापसाचे गाठोडे वाहून आणणाऱ्या बैलबंडीला जोरदार धडक दिली यात महेश पिंपळकर हा जागीच मरण पावला.
महेश हा वडीलाला एकटाच असून नुकतीच त्यांना वेकोलीकमध्ये नोकरी लागली होती, नेहमीप्रमाणे दररोज प्रशिक्षणाला जात होता मा घरी जाण्याच्या नादात वेगात मोटर सायकल असल्याने धडक एवढी जोरदार होती की मोटरसाईकला बैलबंडीच्या आत घुसली यात बैलाला सुद्धा जखमी झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत