मातृशक्तीच्या आरोग्यासाठी गॅसचा वापर आवश्यक- जिल्हाध्यक्ष भाजयुमो विशाल निंबाळकर #bjp

Bhairav Diwase
28 गरजूंना भाजयुमोने केले उज्ज्वला गॅसचे वितरण.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक उपक्रम शेवटच्या माणसासाठी आहेत. त्यांची सेवा करण्याचा निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. हाच धागा पकडून लोकनेते आ सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळात प्रचंड मदत कार्य केले. हे कार्य अजूनही सुरू आहे. त्याच धर्तीवर गरजूनां पंतप्रधान उज्ज्वला गॅसचे वितरण केले जात आहे. पर्यावरणासह मातृशक्तीच्या आरोग्यासाठी घरगुती गॅसचा वापर गरजेचा आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.ते भाजयुमो चंद्रपुर तर्फे आयोजित प्रधानमंत्री उज्वला गॅस वितरण कार्यक्रमात 19 नोव्हेंबरला महाकाली काँलरी शहीद भगत सिंह चौक येथे कार्यक्रमाचे नेतृत्व करतांना बोलत होते.
माजी वित्त मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,भारतीय जनता पक्ष जिल्हा चंद्रपूर चे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चा चे अखिलेश रोहिदास यांच्या पुढाकारातुन घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासंगोट्टूवार,नगरसेवक प्रदिप किरमे, भाजयुमो उपाध्यक्ष यश बांगडे,भाजयुमो उपाध्यक्ष स्नेहीत लांजेवार,सचिव श्री  प्रविण उरकुडे, भाजयुमो उपाध्यक्ष आकाश मसके, रामकुमार आक्कापेल्लीवार, सिन्धूताई राजगुरे, रंजना उमाटे, आशा राजभर ,चंदा रविदास यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये 28 लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन, गॅस सलेंडर व शेगडी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिलेश रोहिदास, संचालन आकाश म्हस्के यांनी केले व आभार प्रदर्शन प्रवीण उरकुडे यांनी मानले.#bjp