Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

अवैध उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर पकडले #Gondpipari

नांदगाव घाटावर मंडळ अधिकाऱ्याची दुसरी धडक कारवाई.
गोंडपिपरी:- गेल्या वर्षीपासून रेती गटांचे लिलाव रखडल्याने अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्या माफियांनी डोके वर काढले असून तालुक्यातील विविध घटनांमध्ये अवैद्य करण्याचा सपाटा सुरू केला होता. यावर अंकुश लावण्यासाठी गोंडपिपरी मंडळाधिकारी सुर्वे यांनी धडक मोहीम हाती घेत तालुक्यात सलग दुसरी कारवाई पार पाडत अवैध उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर काल रात्रीच्या सुमारास तालुक्यातील नांदगाव वातावरण पकडण्यात आले. सदर कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या मुळे गोंडपिपरी तालुका हा खनिज संपत्तीने नटलेला तालुका म्हणून ओळखला जातो. अशातच येथील वाळू ही दर्जेदार असल्याने बांधकाम क्षेत्रात वाळूची मागणी मुबलक प्रमाणात आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून येथील रेती घाटाचे लिलाव रखडल्याने या संधीचा गैरफायदा घेत अवैद्य उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांनी डोके वर काढले असून विविध रेती घाटांवर अवैद्य उत्खनन करण्याचा सपाटा सुरू केला होता. अशातच काल रात्रीच्या सुमारास गोंडपिपरी मंडल अधिकारी सुर्वे यांनी सापळा रचून गोपनीय माहिती च्या आधारे तालुक्यातील नांदगाव (घडोली ) नदी घाटवर अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच आपल्या चम्मू सह धाड घालून अवैध रेती उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. सदर दोन्ही ट्रॅक्टरवर प्रादेशिक परिवहन विभाग याचे रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेले नसून वाहन चालकाच्या सांगण्यानुसार सदर दोन्ही फॅक्टरी तालुक्यातील नांदगाव येथील माणुसमारे बंधू यांची असल्याची माहिती मंडळ अधिकारी सुर्वे यांनी दिली आहे. उत्खनन करणाऱ्या दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय प्रांगणात लावण्यात आले असून पुढील दंडात्मक कारवाई साठी तहसीलदार यांचेकडे अहवाल सादर केल्याची माहिती सुर्वे यांनी बोलताना दिली.
जप्त करण्यात आलेली ट्रॅक्टर तिसऱ्यांदा सापडली....
काल रात्रीच्या सुमारास मंडळ अधिकारी सुर्वे यांनी पकडलेल्या अवैध उत्खनन करणार्‍या हे प्रकरण पैकी हेक्‍टर सलग तिसऱ्यांदा अवैध उत्खनन करताना सापडले असून महसूल विभागाच्या अधिनियमानुसार दंडात्मक कारवाईत तिप्पट वाढ होणार काय असा सवाल सोशल मीडियातून विचारला जात आहे.अवैद्य उत्खननाची माहिती द्यावी....
तालुक्यातील कुठल्याही रेती घाटांवर अवैध उत्खनन सुरू असल्यास त्याची तात्काळ माहिती महसूल विभागात कडे पुरवून रात्रपाळी चालणारा या गोरख धंद्यावर अंकुश लावण्यात नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे असे आवाहन गुंडवली मंडळ अधिकारी सुर्वे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत