Top News

विद्यार्थ्यांच्या सरंक्षणासाठी पोलीस काका आणि पोलीस दीदी #Pombhurna #police

पोलिस प्रशासनाचा शाळांमध्ये नवा उपक्रम
घाटकुळ शाळेतून करण्यात आली सुरूवात
पोंभूर्णा:- महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याकरिता पोलीस विभागाकडून ‘पोलीस काका, पोलीस दीदी’ हा उपक्रम घाटकुळ येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय येथून सुरु करण्यात आले. यामुळे आता प्रत्येक शाळेत पोलिसांचा पहारा असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी आता करता येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून ठाणेदार धर्मेंद्र जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रफुल निमसरकार, सुरज गोरंतवार, हुजबाना पठाण, प्रियंका वाढई, मिनाक्षी गेडाम, प्रविण कोवे, बादल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
लहान मुलं तसेच शाळकरी विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, रॅगिंग, छेडछाड, इतर गुन्हे रोखण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पोंभूर्णा पोलिस स्टेशन हद्दीतील शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमाअतंर्गत पोलिस स्टेशन हद्दीतील शाळांमध्ये माहिती फलक लावण्यात आले असून त्या फलकावर ठाणेदार, दोन पोलिस काका, दोन पोलिस दिदी यांचे नाव व नंबर देण्यात आले आहे. यातील पोलीस अधिकारी नेहमी शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणार आहेत. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला काहीही त्रास झाल्यास ते संपर्क करुन माहिती दिल्यास पोलिस तात्काळ त्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहतील. पोलिसांच्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने