मनसेच्या रूग्णमित्रांनी घडविले माणुसकीचे दर्शन #Chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपुर:- महाकाली कॉलरी रय्यतवारी पुलाचे कडेला महानगरपालीकेच्या घंटागाडीने एका अज्ञात व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने तो व्यक्ती रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मात्र त्याकळे कोणीही लक्ष देत नव्हते अशातच घटणास्थळावर उपस्थित एका इसमाने मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता यांना भ्रमणध्वणी वरून संपर्क करून या घटणेची सविस्तर माहिती दिली.

मनसे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच घटणास्थळी पोहचले. सदर इसमाची गंभीरता लक्षात घेऊन मनसेचे दुसरे रुग्नमित्र प्रविण शेवते यांनाही ही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तेव्हा दोन्ही मनसेच्या रूग्नमित्रांनी सदर व्यक्तीला औषधोपचारासाठी जिल्हासामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असून रूग्णाची प्रकृती सध्या सुरळीत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
महानगरपालीकेच्या घंटागाळीने एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला असता तर मोठा अनर्थ झाला असता प्रभागातून घंटागाळी नेत असतांना वेग कमी असावे अशी मागणी परीसरातील नागरींकाकडून केली जात आहे. तसेच मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता व प्रविण शेवते तात्काळ घटणास्थळी पोहचून वेळेवर औषधोउपचार झाले नसते तर सदर व्यक्तीची जीवीतहानी नाकारता येत नाहि परीसरातील नागरींकाकडून मनसे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता व प्रविण शेवते यांचे कौतूक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)