जाहिरात... Advertisement... विज्ञापन

युवा संमेलनासाठी आमदार रोहीत पवार चंद्रपुरात. #Chandrapur.

किसानपूत्र फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली बारामतीत भेट; वाघ-मानव संघर्षावर केली चर्चा.
चंद्रपूर:- जिल्ह्यातील युवकांना थेट आमदार रोहीत पवार यांच्याशी संवाद साधता यावा, याकरिता किसानपूत्र फाऊंडेशनच्या वतीने येत्‍या जानेवारी- फ्रेब्रुवारी महिन्‍यात युवा संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतेच बारामती येथील बारामती ॲग्रो फाॅर्म येथे किसानपूत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रा. राजेश पेचे, युवा उद्योजक संतोष कुचनकर यांनी आमदार रोहीत पवार यांची भेट घेतली. यावेळी रोहीत पवार यांनी चंद्रपुर जिल्ह्यातील उद्योग , रोजगार, प्रदूषण आणि वन्य मांवजीव संघर्ष यासविस्तर चर्चा केली.. या संमेलनात आपण स्‍वतः मंत्रीमंडळातील युवा मंत्र्यांची वेळ घेऊन येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
😊
नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार चंद्रपुरात येऊन गेले. त्‍यावेळी जिल्ह्यातील उद्योगांविषयी त्‍यांनी सखोल मार्गदर्शन केले. युवा उद्योजक म्‍हणून आमदार रोहीत पवार हे युवकांचे आयडॉल आहेत. सोबतच कृषी क्षेत्रात त्‍यांचे मोठे कार्य आहे. त्‍याकरिता जिल्ह्यातील कृषीवर आधारीत उद्योग करण्याकरिता युवकांना प्रेरित करण्यासाठी या युवा संमेलनाचे आयोजन करीत असल्‍याचा मानस किसानपूत्र फाऊंडेशनचा आहे. या संमेलनातून जिल्ह्यातील युवकांना राजकारण तसेच उद्योग या दोन्‍ही क्षेत्रात आपले करिअर करण्याकरिता त्‍यांचे मार्गदर्शन उपयुक्‍त ठरणार आहे.
😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत