Top News

विरुर पोलीसांची धडक कारवाही. #police

शेतात गांजाची लागवड; कारवाईत 20 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त



(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टेशन
विरुर स्टे:- पोलीस स्टेशन विरुर हद्दीत लाईनगुडा या गावातलगत असणाऱ्या शेतात प्रतिबंधीत असलेली गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी गोपनीय माहीती पोलीस स्टेशन विरुर येथे प्राप्त झाली.
 गोपनीय माहिती नुसार पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. राहूल चव्हाण यांनी पोलीस स्टाफसह शेतात जावून रेड केली असता सदर शेत हे भिमराव पत्र मडावी वय 68 वर्ष रा. लाईनगुडा ता. राजूरा जि. चंद्रपूर याचे असल्याची माहीती मिळाली. पोलीसांनी जावून रेड केली असता सदर इसम हा आपले शेतात मिळून आला. पंचासमक्ष शेताची पाहणी केली असता शेतात एकूण 37 झाडे लावलेली व चांगली वाढलेली मिळून आली.
 सदर कारवाईत 37 झाडे, वजन एकूण 20.500 किलो अ.कि. 205000/- रुपयाचे मिळून आले. आरोपी नामे भिमराव पत्र मडावी वय- 68 वर्ष रा. लाईनगुडा ता. राजूरा जि. चंद्रपूर यास ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन विरूर येथे NDPS कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करणे सुरू आहे.


 सदरची कारवाई चंद्रपूर पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतूल कुलकर्णी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजा पवार यांचे मार्गदर्शनात विरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. राहूल चव्हाण, ना.पो.शि. नरेश शेंडे, पो.शि. सुरेंद्र काळे, रामदास निल्लेवार, प्रविण जुनघरे, अशोक मडावी, रोशनी घिवे, प्रविण कांबळे, अतुल शहारे यांनी केली.#police

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने